फेक न्यूज ची दुनिया
सो शल मिडिया मुळे जग खूप जवळ आले आहे , माहितीच्या देवाणघेवानीचा वेग ही प्रचंड वाढलेला आहे. त्यात आपल्या पर्यंत पोहचणाऱ्या माहितीची सत्यता किती असेल याची काही शाश्वती देता येत नाही. अशा वेळी आपण आपला विवेक वापरून त्या माहिती वर विश्वास ठेवायचा की नाही ते ठरविले पाहिजे. माहितीची सत्यता पडताळून पाहिल्या शिवाय आपण ती माहिती पुढे पाठवली नाही पाहिजे. बऱ्याच वेळा आपण अनुभवले असेल , पाहिले असेल किंवा वाचले असेल की अशा खूप साऱ्या पोस्ट सोशल मिडियावर फिरत असतात ज्या मध्ये डॉक्टर , शास्त्रज्ञ , नामोलेखित संस्था यांच्या नावाचा वापर केलेला असतो आणि आपण डोळे झाकून ती माहिती समोर पाठवतो. आपण समजून घेऊया की या सोशल मिडियाच्या युगात माहितीच्या सत्यता आणि विश्वासार्हते बद्धल कसे सजग राहता येईल. १. प्रकाशकाची विश्वासार्हता तपासा: एखादी वेबसाईट , पेज , किंवा व्यक्ती तुमच्या सर्कल मध्ये प्रसिध्द आहे याचा अर्थ त्यांनी पाठवलेली माहिती/ बातमी सत्य असेलच अस होत नाही. पडताळून पहा. २. संकेत स्थळाची सत्यता तपासा: बऱ्याचवेळा मूळ वेबसाईटचा थोडयाफार फरकाने मिळताजुळता URL तयार करून आपली दिशाभूल करण्...
Comments
Post a Comment