फेक न्यूज ची दुनिया

सोशल मिडिया मुळे जग खूप जवळ आले आहेमाहितीच्या देवाणघेवानीचा वेग ही प्रचंड वाढलेला आहे. त्यात आपल्या पर्यंत पोहचणाऱ्या माहितीची सत्यता किती असेल याची काही शाश्वती देता येत नाही. अशा वेळी आपण आपला विवेक वापरून त्या माहिती वर विश्वास ठेवायचा की नाही ते ठरविले पाहिजे. माहितीची सत्यता पडताळून पाहिल्या शिवाय आपण ती माहिती पुढे पाठवली नाही पाहिजे. बऱ्याच वेळा आपण अनुभवले असेल, पाहिले असेल किंवा वाचले असेल की अशा खूप साऱ्या पोस्ट सोशल मिडियावर फिरत असतात ज्या मध्ये डॉक्टर, शास्त्रज्ञ, नामोलेखित संस्था यांच्या नावाचा वापर केलेला असतो आणि आपण डोळे झाकून ती माहिती समोर पाठवतो. आपण समजून घेऊया की या सोशल मिडियाच्या युगात माहितीच्या सत्यता आणि विश्वासार्हते बद्धल कसे सजग राहता येईल. 

१. प्रकाशकाची विश्वासार्हता तपासा: एखादी वेबसाईट, पेज, किंवा व्यक्ती तुमच्या सर्कल मध्ये प्रसिध्द आहे याचा अर्थ त्यांनी पाठवलेली माहिती/ बातमी सत्य असेलच अस होत नाही. पडताळून पहा.

२. संकेत स्थळाची सत्यता तपासा: बऱ्याचवेळा मूळ वेबसाईटचा थोडयाफार फरकाने मिळताजुळता URL तयार करून आपली दिशाभूल करण्याचा पर्यंत केला जातो. त्यामुळे आपल्याला अपेक्षित वेबसाईट वरील बातमी आपण वाचतो आहोत याची नेहमी खात्री करणे गरजेचे असते.

३. प्रकाशकाचा हेतू लक्षात घ्या: आता तुम्ही म्हणाल की हे कस समजणार आपण का अंतर्यामी आहोत? काही वेळा बातमी व्यंगात्मक असू शकते, अशा वेळी आपण बातमीचा किंवा त्या माहितीचा अर्थ लावताना चूक करतो. त्यामुळे एकाद्या बातमी मागचा लेखकाचा/ प्रकाशकाचा उद्धेश काय असेल हे जाणून घेतले पाहिजे. तुम्ही बातमी जर तटस्तपणे वाचलात आणि लेखका बध्दल जाणून घेतलात तर तुम्हाला लेखकाचा/प्रकाशकाचा/बातमीदाराचा हेतू समजण्यास वेळ लागणार नाही.

४. लेखक कोण आहे ते पहा: अनेक वेळा बातमीला संदर्भच नसतो, इतकेच नाही ती निनावी पण असते. त्यामुळे लेखका विषयी माहिती घ्या त्या बातमीचा मूळ स्त्रोत काय आहे ते पहा. या विषयातील त्या लेखकाच्या अभ्यासाबद्धल तुम्हाला खात्री पटते का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. 

५. गुणवत्ता आणि Timeline वर लक्ष द्या: तुम्ही बारकाईने पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच वेळा शुद्धलेखनातील, व्याकरणातील चुका, उद्गार चिन्हांचा अतिवापर इ. गोष्ठी आपल्याला दिसतात. नावाजलेली लोक किंवा समूह त्यांचा मजकूर आणि व्याकरण खूप काळजी पूर्वक तपासून पाहतात. त्यामुळे त्यांच्या कडून अशा चुका होणे अपेक्षित नसते. त्याच बरोबर हेही पहा की बातमी नवीन आहे की जुनी आहे. बातमी नवीन असेल तर पुढे पाठवण्याची घाई करू नका आणि जुनी असेल तर त्या बातमीचा मागचा पुढचा परस्पर संबंध पहा.

६. संदर्भ तपासा: तुम्ही लेख/बातमी/माहिती कशी मिळवत आहात या कडे लक्ष असू द्या जर सोशल मिडिया वर एखादी माहिती तुमच्या पुढे आली आणि तुम्ही ती उघडताना जर संबंधित वेबसाईट वर ‘caution’ अर्थात खबरदारीच्या सूचना आल्या तर पुढे जाण्याआधी विचार करा मग त्या माहितीचा संदर्भ तुमच्या मित्राकडून आलेला असला तरीही!

७. Cross Check: एखादा हेतू साध्य करण्यासाठी किंवा चुकीची माहिती पसरविण्यासाठी एखादे वाक्य दुसऱ्याच्या नावावर खपवले जाते (हा प्रकार तर आपण सर्रास अनुभवत असाल) बऱ्याच वेळा नावाजलेल्या व्यक्ती किंवा संस्था यांचा वापर केला जातो अशावेळी खात्री साठी तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि माहिती पडताळून पाहू शकता. 

८. संबधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे का ते पहा: जर तशी माहिती दुसरीकडे नसेल तर संबधित बातमी आणि पत्रकारीते बद्धल तुम्हाला शंका उपस्थित करणे जमले पाहिजे.

९. तुम्ही कधी बातमीची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला आहे का? संदर्भासाठी नेहमी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता (उदाहरणासाठी समजून घेऊ की जर नोवेल कोरोना विषाणू बद्धलच्या प्रतीजैविकाच्या शोधाची बातमी ऐकलात तर त्या वर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही भारत सरकारच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईट वर भेट द्या जसे की - mohfw.gov.in किंवा WHO)

१०. प्रकाशकाचा हेतू आणि point of view जाणून घ्या आणि सर्वात महत्वाचे या फोटोशॉपी च्या जादुई दुनियेत तुम्ही एखादी प्रतिमा पाहून त्यावर विश्वास ठेवू नका कारण तुम्ही कल्पना करू शकत नाही इतक्या अचूकपणे प्रतिमेची नकल केली जाऊ शकते. 

११. अशा वेळी आपण काय करू शकतो तर ‘Fact-Check’ अर्थात सत्य पारखून घेतले पाहिजे. काही Fact Checking वेबसाईट आहेत त्या पैकी image.google.com or tineye.com, FactCheck.org, International Fact-Checking Network (IFCN), Politifact.com, Snopes.com आपण स्वतःच जासुसी करून माहितीची सत्यता तपासू शकता. 

विशेष टीप: आपल्या समोर येत असलेल्या अगणित माहितीची निवड करताना आपला विवेक वापरावा, त्यासाठी वरील गोष्टीचा आपल्याला आधार घेता येईल. 



Comments

Popular posts from this blog

Transforming Education in Maharashtra: Challenges and the New Education Policy

Finding Mental Peace: A Journey to Well-Being